लटकता स्तंभ : श्रद्धा, शिल्पकला आणि विद्यार्थ्यांसाठी जीवनपाठ
 
  लटकता स्तंभ : श्रद्धा, शिल्पकला आणि विद्यार्थ्यांसाठी जीवनपाठ भारतीय संस्कृती ही केवळ देव-देवतांची उपासना, मंदिरे किंवा पूजा-अर्चा यापुरती मर्यादित नाही. ती एक संपूर्ण जीवनपद्धती आहे, ज्यामध्ये कला, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म एकत्र गुंफलेले आहेत. आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिरातील “लटकता स्तंभ” हा याच संस्कृतीचा, याच परंपरेचा आणि याच अद्भुत कलाकृतीचा एक विलक्षण नमुना आहे.  १६व्या शतकातील विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेले हे मंदिर आजही प्रत्येक पर्यटकाला, भक्ताला आणि अभ्यासकाला चकित करून सोडते. भगवान शिवाच्या उग्र रूप असलेल्या वीरभद्राला  अर्पण केलेले हे मंदिर केवळ धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे नाही, तर अभियांत्रिकी, शिल्पकला आणि मानवी कल्पकतेचे उत्तम उदाहरण आहे.   लटकता स्तंभ : एक रहस्य, एक प्रतीक  लेपाक्षी मंदिरातील हा विशेष स्तंभ जमिनीला पूर्णपणे टेकलेला नाही. त्याच्या पायथ्याशी एक बारीकशी फट आहे, ज्यातून लोक कपडा, कागद किंवा फुलं सरकवतात आणि हे एक प्रकारचे भक्तिभावाचे प्रतीक मानतात.  लोकान्नी दिलेल्या माहीतीनुसार, हेमिल्तोन या एका ब्रिटिश अभियंत्याने या स्तंभावर प्रय...
 
 
 
 
 
