Posts

Showing posts from September, 2025

लटकता स्तंभ : श्रद्धा, शिल्पकला आणि विद्यार्थ्यांसाठी जीवनपाठ

Image
  लटकता स्तंभ : श्रद्धा, शिल्पकला आणि विद्यार्थ्यांसाठी जीवनपाठ भारतीय संस्कृती ही केवळ देव-देवतांची उपासना, मंदिरे किंवा पूजा-अर्चा यापुरती मर्यादित नाही. ती एक संपूर्ण जीवनपद्धती आहे, ज्यामध्ये कला, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म एकत्र गुंफलेले आहेत. आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिरातील “लटकता स्तंभ” हा याच संस्कृतीचा, याच परंपरेचा आणि याच अद्भुत कलाकृतीचा एक विलक्षण नमुना आहे. १६व्या शतकातील विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेले हे मंदिर आजही प्रत्येक पर्यटकाला, भक्ताला आणि अभ्यासकाला चकित करून सोडते. भगवान शिवाच्या उग्र रूप असलेल्या वीरभद्राला अर्पण केलेले हे मंदिर केवळ धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे नाही, तर अभियांत्रिकी, शिल्पकला आणि मानवी कल्पकतेचे उत्तम उदाहरण आहे. लटकता स्तंभ : एक रहस्य, एक प्रतीक लेपाक्षी मंदिरातील हा विशेष स्तंभ जमिनीला पूर्णपणे टेकलेला नाही. त्याच्या पायथ्याशी एक बारीकशी फट आहे, ज्यातून लोक कपडा, कागद किंवा फुलं सरकवतात आणि हे एक प्रकारचे भक्तिभावाचे प्रतीक मानतात. लोकान्नी दिलेल्या माहीतीनुसार, हेमिल्तोन या एका ब्रिटिश अभियंत्याने या स्तंभावर प्रय...

आत्मविश्वास, अज्ञान आणि शहाणपणाची खरी ओळख

Image
आत्मविश्वास, अज्ञान आणि शहाणपणाची  खरी  ओळख कधी तुमच्यासोबत असं घडलंय का की एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने एखाद्या विषयावर इतक्या आत्मविश्वासाने बोललं की तुम्ही त्याला खरं मानून टाकलं… आणि नंतर लक्षात आलं की त्याला खरंतर काहीच माहिती नव्हती?  आणि दुसरीकडे, ज्यांना खरंच एखाद्या विषयाची सखोल माहिती आहे, ते मात्र बोलताना हळू, सावध, शंका व्यक्त करत बोलतात. हे पाहून तुम्हाला कधी असं वाटलंय का की “हा एवढा शंकाच का घेतो, याला आत्मविश्वास नाही का?” हीच गंमत आहे मानवी स्वभावाची! यामागे आहे मानसशास्त्रातलं एक भन्नाट सत्य: डनिंग-क्रुगर इफेक्ट आणि त्याचं उलट रूप रिव्हर्स डनिंग-क्रुगर इफेक्ट. मानवी स्वभावातील एक गंमतीशीर पण फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान आणि आत्मविश्वासाचा संबंध . तुम्ही नक्कीच अनुभवलं असेल की काही लोक अगदी विषयाची कसलीही माहिती नसतानाही छातीठोकपणे, फार मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात. तर दुसरीकडे जे खरोखर अभ्यासू, तज्ज्ञ किंवा विद्वान असतात, ते मात्र शांतपणे, जपून बोलतात, त्यांच्या भाषेत खात्रीपेक्षा शंका अधिक दिसून येतात. हा विरोधाभास फक्त आपल्याला वाटत नाही,...

कैलास मंदिर आणि अभियंत्यांची सृजनशीलता

Image
  कैलास मंदिर आणि अभियंत्यांची सृजनशीलता मानवाच्या इतिहासाकडे पाहिलं तर त्यात दोन ठळक गोष्टी आढळतात,  भव्य कला आणि अभूतपूर्व अभियांत्रिकी कौशल्य . आज आपण अभियांत्रिकी दिन साजरा करीत असताना, आपल्या देशातील सर्वात अद्भुत अभियांत्रिकी चमत्कारापैकी एक – एलोऱ्याचे कैलास मंदिर याचा उल्लेख टाळणे शक्यच नाही. एलोरा येथील हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर मानवाच्या कल्पकतेला, चिकाटीला आणि अद्वितीय कर्तृत्वाला सलाम करणारे एक सजीव उदाहरण आहे. जगभरातील इतिहासकार, वास्तुविशारद आणि शास्त्रज्ञ आजही या मंदिराकडे आश्चर्याने पाहतात. खडकातून उभे राहिलेले देवालय आपण पाहिलेल्या बहुतेक मंदिरांची बांधणी वीट, दगड किंवा मातीच्या गोट्यांपासून झालेली असते. पण कैलास मंदिर याला अपवाद आहे. ते कोरून तयार करण्यात आले आहे तेसुद्धा एकाच खडकातून! इ.स. ८व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने या देवळाचे काम सुरू केले. परंतु येथे अद्वितीय बाब अशी की, अभियंत्यांनी मंदिर वरून खाली कोरायला सुरुवात केली. सामान्य पद्धतीने पायाभरणी करून रचना उभारली जाते, तर इथे उलट, वरून छत तयार करून नंतर हळूहळू खाली जात ...

आरक्षण घेत असलेल्या श्रीमंतांना टॅक्ससवलत : एक अतुलनीय सामाजिक सुधारणा!

Image
  आरक्षण घेत असलेल्या श्रीमंतांना टॅक्ससवलत :   एक अतुलनीय सामाजिक सुधारणा! आरक्षण हा विषय ऐकला की महाराष्ट्रातल्या राजकारणाची पोटदुखी सुरू होते. इथे गल्लीतल्या चहाच्या टपरीवर चर्चा सुरू झाली, तरी पाच मिनिटात संभाषण आरक्षणावर वळतं. जणू काही आरक्षणाशिवाय आपलं राजकारण, आपली शिक्षणव्यवस्था आणि आपला सामाजिक संवाद अपूर्ण आहे. आजपर्यंत आपण आरक्षणाचं किती तरी फॉर्म्युलं ऐकले, काही टक्के तिथे, काही टक्के इथे. कुणाला शिक्षणात सवलत, कुणाला नोकरीत सवलत, कुणाला फीस माफी, तर कुणाला परीक्षा पास होण्याचं औषधच थेट सरकारी नोटिफिकेशनने मिळालं. पण एवढं सगळं झालं तरी समाजातला द्वेष मात्र कमी झाला नाही, उलट वाढलाच. आता नवीनच एक क्रांतिकारी कल्पना मांडली जाते – आरक्षणातील श्रीमंतांना इनकमटॅक्समध्ये सवलत द्यावी! श्रीमंतांचा आरक्षित प्रवास बघा, आजच्या घडीला एक आरक्षित विद्यार्थी शाळेत गेला की त्याला "जात मार्क्स सवलत" मिळते. कॉलेजात गेला की "फीस माफी" मिळते. नोकरीत गेला की "राखीव पद" मिळतं. लग्नाला गेला तर "आरक्षित मंडप" मिळतो. एवढं असूनही त्याचं कुटुंब जर करोडपती झ...

आपल्या मुलांच्या धार्मिक उत्सवांचा सन्मान ही आपली सामूहिक जबाबदारी

Image
    आपल्या मुलांच्या धार्मिक उत्सवांचा सन्मान ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारतामध्ये १०० कोटींपेक्षा अधिक हिंदू राहतात. आपल्या धर्माची, आपल्या परंपरांची आणि उत्सवांची श्रीमंती जगात कुठेही सापडणार नाही. पण प्रश्न असा आहे की, शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक व्यवस्थेत आपल्या उत्सवांना किती प्रमाणात मान्यता मिळते?  उत्सव म्हणजे संस्कृतीचे शिक्षण आपल्या धर्मातील सण केवळ आनंदाचे दिवस नाहीत. दिवाळी, गणेशोत्सव, होळी, नवरात्री, महाशिवरात्र हे सर्व आपल्या मुलांना धर्म, मूल्यं, परंपरा आणि संस्कृती शिकवतात. एकेका विधीत खोल तत्त्वज्ञान दडलेले असते. अशा सणांचा अनुभव घेऊनच पुढच्या पिढ्यांना आपल्या परंपरा समजतात. शिक्षण आणि श्रद्धा – दोन्ही महत्त्वाचे आज अनेकदा मुलांना असा प्रसंग येतो की शाळेत एखादा प्रोजेक्ट, परीक्षा किंवा महत्वाची वर्गक्रिया नेमकी दिवाळी किंवा दुसऱ्या सणाच्या दिवशी असते. पालक आणि विद्यार्थी द्विधा मनःस्थितीत पडतात – श्रद्धा पाळावी की शिक्षण पुढे न्यावे? पण खरी गोष्ट अशी आहे की श्रद्धा आणि शिक्षण दोन्ही एकत्र चालू शकतात  जर शाळा, पालक आणि समाज या तिघांनी परस्...