बुद्धिबळ, वडील आणि मुलगा : आयुष्याचा पट

बुद्धिबळ, वडील आणि मुलगा : आयुष्याचा पट

लेखक: श्री. धनंजय शिंगरूप


या संदर्भातील कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.: 👉 कविता


बुद्धिबळ एक साधा वाटणारा पण फार गहन अर्थ लाभलेला खेळ. काहींकरता तो केवळ काळ घालवण्यासाठीचा विरंगुळा असतो, पण खरंतर तो जीवनाचं एक सुंदर तत्वज्ञान घेऊन येतो. एका बाजूला काळ्या आणि दुसऱ्या बाजूला पांढऱ्या घरांवर चालणारा हा खेळ, जीवनात चाललेल्या अनेक संघर्षांचा आरसा असतो. आणि या पटावर जेव्हा वडील आपल्या मुलासोबत बसतात, तेव्हा त्यातून केवळ खेळच नव्हे तर एक जीवनवाटेचं शिक्षणही सुरू होतं.

खेळाला सुरुवात होते, बुद्धिबळाचा पट मांड्ल्या जातो. मुलगा प्याद्याला पुढे सरकवतो. वडील शांतपणे हसतात. हे केवळ प्याद्याच पुढे सरकणं नाही, ही आहे एका प्रवासाची सुरुवात जिथे मुलगा शिकतो निर्णय घ्यायला, तर वडील शिकवतात संयम.

वडील बुरुजासारखे, स्थिर आणि मजबूत. मुलगा प्याद्यासारखा, हळूहळू शिकत पुढे जाणारा. राजा, वजीर, उंट, घोडा  हे केवळ खेळाचे घटक नाहीत, तर ती नात्यांची प्रतीकं बनून जातात. वडील सांगतात , "प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळ. आयुष्यात प्रत्येक कृती मागे कारण असावं."

हा  तत्त्वज्ञानाच्या छायेत चालणारा खेळ आहे. बुद्धिबळ हा केवळखेळ नसून जीवनशास्त्र आहे. खेळातील प्रत्येक क्षण हे जीवनातील संघर्ष, संधी आणि शहाणपणाचं प्रतीक आहे. वडिलांचं मार्गदर्शन म्हणजे जणू अनुभवाचा दिवा आणि मुलाचं आत्मभान म्हणजे नवीन शक्यतांचा प्रकाश.

“ जीवनात आपण चाल चालतो,

पण त्या चालीत जर प्रेम, धीर आणि शिकवण असली,

तर प्रत्येक पराभवही एक विजय ठरतो. ”

वडील आणि मुलगा जेव्हा बुद्धिबळ खेळतात, तेव्हा दोन पिढ्यांमधील एक नाजूक पण घट्ट बंध निर्माण होतो. त्या प्रत्येक चालीमागे असते – समजूत, साथ आणि संस्कार.

मुलांसाठी वडील म्हणजे काय? हे आता जाणून घेऊ. वडील म्हणजे खेळातला मार्गदर्शक नाही तर आयुष्याचा मार्गदर्शक. जेव्हा जेव्हा ते आपल्या मुलासोबत खेळतात, तेव्हा ते एक नविन संवादाच दालन उघडतात. मोबाईलमधील गेम्सपेक्षा वेगळा हा खेळ, एकत्र बसण्याचं, संवादाचं आणि शिकवण्याचं माध्यम होतो.ते मुलाला सांगतात,

"बघ, प्रत्येक प्याद्याचंही स्वतःचं महत्त्व असतं.

लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस.

संयम बाळग, आणि योग्य वेळेची वाट बघ."

हे वाक्य केवळ खेळापुरतं मर्यादित राहत नाही,ते मुलाच्या मनात खोलवर रुजतं.

आजची पिढी आणि पालकत्व याच्या संदर्भात बोलायचे झाल तर, आजची पिढी मोबाईलच्या आणि टीव्हीच्या स्क्रीनमध्ये अडकलेली आहे, हे आपण सगळेच मान्य करतो. पण प्रश्न आहे, त्यामागे चूक कोणाची? मुलं मोबाईलमध्ये वेळ घालवतात, कारण तिथे त्यांना मनोरंजन, साथ आणि संवाद मिळतो मग ते मनोरंजन अश्लिलतेकडे नेणारे असो, ती साथ वेळेचा अपव्यय कर्नारि असो किंवा तो सम्वाद संस्कार-क्शम नसो.

जे अनेकदा आपल्या व्यस्त दिनक्रमामुळे आपण त्यांना देऊ शकत नाही. आपण कामात, फोनमध्ये, सोशल मीडियामध्ये एवढे गुंतलेलो असतो की आपल्या मुलान्सोबत सुसंवादही साधु शकत नाही आणि आपण नेहमी म्हणत राहतो, "ही पिढी चुकत चालली आहे."

पण खरा प्रश्न हा आहे की त्या चुका रोखण्यासाठी आपण किती वेळ दिला?

नाईलजाने म्हणावे लगत आहे की मोबाईल नेटवर्कपेक्षा मजबूत नातं हे आई-वडील आणि मुलांच असयला हवे. मोबाईल हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, ते मुलांना अटेंड करणारे पर्यायी साधन आहे. जेव्हा आई-वडील वेळ देत नाहीत, तेव्हा मोबाईल त्याना वेळ देतो, आवाज, रंग, इन्ट्राराक्शन आणि सततची संगत.

मुलांना दोष देण्याआधी, त्यांच्या भावविश्वात डोकावून पहा. तेही आपलं प्रेम शोधत असतात, फक्त थोडा वेळ, थोडं लक्ष आणि थोडं समजून घेणं एवढ्च त्यान्ना हवं असतं.

मोबाईलच "नेटवर्क" कितीही मजबूत असो, मुलांच्या आयुष्यातली खरी कनेक्शन्स आई-वडीलच असतात. आपुलकीचे, प्रेमाचे आणि विश्वासाचे strong आणि reliable!

आईवडिलांची सोबत असली की मुलांना समाधान लाभतं. आपण मुलांना सुधारण्यासाठी शिकवण देतो, पण जर आपणच त्यांच्या जगात प्रवेश केला, तर बदल जास्त प्रभावी होतो.

मुलांसोबत खेळा, त्यांचं बोलणं ऐका, त्यांच्या डोळ्यांतून जग पाहा, आणि त्यांना समजून घ्या. मग त्यांना मोबाईलचं वेड लागत नाही, कारण त्यांना आयुष्यात खरा आधार मिळतो.

परिपूर्ण वडील म्हणजे मुलांच्या आयुष्यातील दीपस्तंभच जणू! वडील हे घराचं फक्त संरक्षण नसून येणाऱ्या लाटांना थोपवणारी भक्कम तटबंदी सुध्दा असतात. अंधारात वाट दाखवणारा, वादळात सोबत करणारा.

बुद्धिबळाच्या एका खेळात जेव्हा वडील मुलाला पटावर बसवतात, तेव्हा ते फक्त चाल चालायला शिकवत नाहीत, तर ते त्याच्या यशस्वी जीवनाची दिशा ठरवतात. ते शिकवतात की, हळूहळू पुढे सरकणं म्हणजे हार नाही, धीर म्हणजे ताकद आहे, आणि थोडंसं मागे सरकणं म्हणजे पुढील विजयाची तयारी असते.

सर्व पालकांनी एक मंत्र नेहमी अंमलात आणला पाहिजे तो मंत्र म्हणजे : "वेळ द्या, विजयी व्हा" मुलांसोबत वेळ घालवा, त्यांच्याशी बोला, त्यांना समजून घ्या. खेळ म्हणजे फक्त करमणूक नाही, तो सहवासाचा सेतू आहे.

बुद्धिबळ, क्रिकेट, किंवा कुठलाही खेळ असो जेव्हा वडील त्यात सहभागी होतात, तेव्हा मुलांच्या आयुष्यात खंबीर आधार, शिकवण आणि प्रेमाचा मूलभूत पाया निर्माण होतो.

“मोबाईल नाही तर वडिलांचा सहवास हवा,

मुलांच्या मनात ज्ञानाचा आणि प्रेमाचा प्रकाश हवा.”

आई-वडिलांच्या प्रेमाचं नेटवर्क जेव्हा सतत चालू राहतं,

तेव्हा कोणत्याही मोबाईल नेटवर्कची गरज मुलांना उरत नाही.


© श्री. धनंजय शिंगरूप

(शिक्षक, समुपदेशक, मार्गदर्शक)

Educator and Trainer at 
Coaching Institute for English and Social Science 







GROWENG STUDIES AND TRAININGS 
CONTACT : 9404911719

Though your like is single it's valuable to us. 

Click on below given title to switch our FB page and like it now.

GROWENG STUDIES AND TRAININGS

MORE HELPFUL COURSES

Know more about Spoken English Class online/offline

मुलांचा अभ्यास कसा घ्यावा?

How to Become Intelligent?

Admissions open for year 2025-26





Comments

Popular posts from this blog

गुणांच्या आभासी दुनियेत हरवलेलं खरं शिक्षण – एक पालक म्हणून आत्मपरीक्षणाची वेळ

सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्यातील एक विचारप्रवर्तक संवाद: यश आणि शांतीचा संगम

आत्मविश्वास, अज्ञान आणि शहाणपणाची खरी ओळख