मन आणि मातृत्व: जीवनाचा हृदयस्पर्शी प्रवास
 
मन आणि मातृत्व: जीवनाचा हृदयस्पर्शी प्रवास जीवनाचा गाभारा नेहमी प्रेम, त्याग आणि सहनशक्ती यांवर उभा असतो. आपल्या हृदयामध्ये अशा असंख्य क्षमतांचा खजिना दडलेला असतो, जो कधीही संपत नाही. हृदय देत राहते, कधी तुटते तर कधी फुटते, पण पुन्हा जोडले जाते. क्षमा करण्याची ताकद त्यात असते. जेव्हा कुणी आपल्याला दुखावते, तेव्हा तेच हृदय आपल्याला पुढे चालत राहण्यासाठी धैर्य देते. हृदयाची ही अद्भुत क्षमता फक्त मानवी जीवनासाठीच नाही तर निसर्गाच्या प्रत्येक घटकासाठी महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे मातृत्वही एक गूढ आणि अद्वितीय शक्ती आहे. मातृत्व म्हणजे केवळ शारीरिक क्षमता नव्हे, तर त्यामागे भावनांचा एक महासागर असतो. गर्भाशय ही फक्त शरीरातील एक जागा नाही; ते एक मंदिरासारख पवित्र स्थान आहे, जिथे नवीन जीवन आकार घेते. एक आई आपल्या वेदना, संघर्ष आणि आनंद यांना विसरून फक्त आपल्या लेकरासाठी जगते. ती सर्व सहन करते, कधी दु:ख सहन करते तर कधी रक्तस्त्राव,  पण तरीही त्या वेदनांच्या आडून जीवन निर्माण करते. हृदय आणि गर्भाशय यांची साम्यस्थळे फार खोल आणि सुंदर आहेत. हृदय जसं प्रेमासाठी आपलं रूप बदलतं, तसं गर्भाशयही नवीन जी...
