गुणांच्या आभासी दुनियेत हरवलेलं खरं शिक्षण – एक पालक म्हणून आत्मपरीक्षणाची वेळ

गुणांच्या आभासी दुनियेत हरवलेलं खरं शिक्षण – एक पालक म्हणून आत्मपरीक्षणाची वेळ दरवर्षी निकाल लागल्यावर आपलं मन अभिमानाने भरून जातं. "माझ्या मुलाने ९५% गुण मिळवलेत!" "मुलगी टॉपला आहे!" "घरात पहिल्यांदाच एवढे चांगले गुण आले!" असं वाटतं की या गुणांनी सगळी स्वप्नं पूर्ण झाली… पण खरंच तस झालंय का? गुण वाढताहेत… पण समज कमी होतेय? या वर्षी CBSE बारावीमध्ये २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ९५% पेक्षा जास्त गुण मिळवले. दहावीमध्ये तर ४५ हजार विद्यार्थ्यांनी ९५% चा आकडा पार केला! पूर्वी जे अशक्य वाटायचं, ते आज सर्रास घडतंय. पण या आकड्यांच्या मागे एक शांत प्रश्न उभा राहतो, हे गुण काय दर्शवतात? ज्ञान? की पाठांतराची चोख प्रॅक्टिस? पुस्तक पाठ करा. उत्तरं लक्षात ठेवा. वहीत लिहिलेलं तसंच उत्तर लिहा, आणि गुण तुमचे! समज, विचार, प्रयोग, प्रश्न... या गोष्टी या सिस्टीममध्ये कुठेच दिसत नाहीत. शिक्षण संपतंय तिथेच जिथे आयुष्य सुरू होतं भारतामध्ये फक्त: २५% MBA पदवीधर २०% इंजिनिअर १०% सामान्य पदवीधरच "नोकरीकरता तयार" मानले जातात. म्हणजे ९५% गुण असले तरी विद्यार्थी प्र...